भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरचं शाईफेक प्रकरण, पोलिसांचं निलंबन, कार्यकर्त्यावर लावलेला मनुष्यवधाचा गुन्हा या सर्व प्रकरणी मध्यस्थीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, नागरी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पिंपरी चिंचवड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या सर्व प्रकरणात राज ठाकरे यांनी मध्यस्थी करावी अशी इच्छा सर्वपक्षीय शिष्टमंडळाने व्यक्त केली. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक व ट्विटरवर एक पत्र पोस्ट करून याप्रकरणावर त्यांची भूमिका जाहीर केली आहे.
#RajThackeray #MNS #DevendraFadnavis #ChandrakantPatil #BJP #Pune #NiteshRane #Sindhudurg #Maharashtra #Shivsena #NCP #EknathKhadse #Jalgaon #GulabraoPatil #MVA